इत्या सहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दरम्यान उघडकीस आली. सवना येथे आज दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास ही घटना घडली. अत्रिनंदन ज्ञानेश्वर गावंडे ( वय १२ वर्ष ) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सवना येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.
घरालगत असलेल्या शेवग्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांने आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या माहिलेस त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. मृतकाचे काका नारायण दिगंबर गावंडे यांनी या घटनेची फिर्याद महागाव पोलीस स्टेशनला दिली. खेळण्या-बागडण्याच्या वयात विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response