जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पाटील यांच्याकडून महागाव येथील शासकीय इमारतीचा आढावा

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पाटील यांच्याकडून  महागाव येथील शासकीय इमारतीचा आढावा

महागाव पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशन इमारतीच्या निर्माणाधीन कार्याचा आढावा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी नुकताच घेतला मंगळवारी दुपारी महागाव येथील त्यांच्या भेटी दरम्यान पोलीस कर्मचाऱ्या करिता उभारण्यात येत असलेल्या पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशन इमारती करिता लागणारी नवीन नियोजित जागेची पाहणी त्यांनी केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला.

पोलीस कर्मचाऱ्या करिता नवीन वसाहत इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले आहे त्या इमारतीला लागूनच महागाव-उमरखेड  या हायवे रस्त्यालगत नव्याने पोलीस स्टेशन इमारती करिता वाढीव जागेची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात आली आहे त्या जागेची लवकरच पूर्तता करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले पोलीस अधिकारी बालाजी शेंगेपल्लू, मेजर शिवराज पवार माझी ग्रामपंचायत सदस्य प्रताप चंदेल बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष तेलतखेडे,संजय भगत यावेळी उपस्थित होते.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने