गेल्या तीन दिवसा पासून जिल्हाधिकारी विरूद्ध डाॅक्टर असा सामना जिल्ह्यात सुरू आहे. डाॅक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी उद्धट आणि अवमानजनक वागणूक दिल्याचा आरोप करित डाॅक्टर संघटनेने प्रशासना विरोधात एल्गार पुकारला आहे.मात्र डाॅक्टरांच्या आंदोलनामागे काॅग्रेस पक्षाचे दोन नेत्यांचा हात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी उद्धट वागणूक दिल्या प्रकरणी डाॅक्टर संघटनांनी जिल्हाधिकारी हटाव चा नारा देत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.मात्र या सर्व घडामोडी मागे काॅग्रेस आणि भाजप चे हात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. काही दिवसा आधी काॅग्रेसचा एक जेष्ठ नेता जिल्हाधिकारी सिंह यांना भेटण्यासाठी गेले होते.
'आणीबाणीच्या प्रस्थितीत आंदोलन करणे चुकीचे'
जिल्ह्यात 'कोरोना'चे संकट गंभीर असताना आणि आणीबाणीच्या काळात डाॅक्टर संघटनेने अडमुठी भूमिका मुळीच समर्थनीय नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी अवमानजनक वागणूक देणे हा विषय फार गंभीर नाही,एरवी कोणावर अन्यायकारक कार्यवाही झाली तर काळ्या फिती लावून काम केल्या जाते.मग एवढ्या सामान्य विषयासाठी थेट काम बंद म्हणजे हेकेखोरपणा नाही का? यामागे राजकारण स्पष्ट दिसून येत असल्याची उघड चर्चा सोशल मिडीया वर सुरू आहे.
मात्र कोरोना संदर्भात महत्वाची बैठक सुरू होण्याची वेळ आणि 'त्या' काॅग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी भेटण्याची वेळ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आधी कोरोना बाबतची बैठक महत्वाची समजून काही वेळ संबधित काॅग्रेस नेत्याला वेटिंग वर ठेवले होते.तद्नंतर जिल्हाधिकारी एक तासा नंतर काॅग्रेस च्या जेष्ठ नेत्याला भेट देखील दिली.मात्र 'आपल्याला' वेटिंग वर ठेवल्याचा राग काॅग्रेस नेत्याचा मनात कायम राहिला आणि डाॅक्टरांचे कान भरून जिल्हाधिकारी विरोधात रान उठवण्याचे नियोजन काॅग्रेसचे दोन नेत्यांनी केल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
जिल्हाधिकारी विरोधात डाॅक्टर संघटना आक्रमक पवित्रा घेत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनात बुधवारी हजारो युवक,महिला आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांना उघड समर्थन दिल्याचे दिसून आले.काहींनी तर आयुष्य पियुष सिंह यांना भेटून जिल्हाधिकारी यांच्या समर्थनात निवेदन दिले.एकंदरीत जिल्हाधिकारी आणि डाॅक्टर संघटनेत हा वाद पेटत असताना पालकमंत्री संजय राठोड यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.पालकमंत्री आज जिल्ह्यात येत असून नेमकी कोणती भूमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response