डाॅक्टरांना अवमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप करित 'मॅग्गो' या वैधकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या विरोधात एल्गार पुकारला असताना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या समर्थनात हजारो सामाजिक संघटना,राजकीय संघटनासह नागरिकां पुढे आले आहे. जिल्हाधिकारी सिंह यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.तसेच सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना पांठीबा देत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान महागांव पत्रकार असोसिएशनने सुध्दा या वादात उडी घेत विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करित,म्हटले आहे की, कोविड-१९ संकटात नागरिकांसोबत समन्वय ठेवून उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे विरूध्द सुरू असलेले आंदोलन राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचा आरोप पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय भगत यांनी केला आहे.
कमिशनर पियुष सिंह यांची भेट घेतांना पत्रकार बांधवकोरोना संकटात डाॅक्टरांनी अडमुठी भूमिका घेणे योग्य आहे का?
सध्या जगासह देशातील मंदिर,मजीद,बुद्ध विहार हे सर्व धार्मिक स्थळे बंद आहे.फक्त डाॅक्टरांच्या भरोष्यावर देशातील नागरिकांनी हवाले केले असताना केवळ वरिष्ठांनी अवमानजनक वागणूक दिल्या प्रकरणी डाॅक्टरांनी अडमुठी भूमिका घेणे योग्य आहे का अशा प्रश्न असुक्षित नागरिकांना जरी विचारलं तरी त्यांचा उत्तर नाही हाच असेल.त्यामुळे ज्या डाॅक्टरांनी राजीनामा दिला आहे.त्या सर्व डाॅक्टरांचे राजीनामा मंजूर करून डाॅक्टरांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी सिंह यांना समतापर्व प्रतिष्ठाण यवतमाळ यांनी जाहिर पांठीबा दिला असून सध्या महामारी चा सामना करून लोकांचे जीव महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.जन आंदोलन आधार समितीने सुध्दा विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
डाॅक्टर संघटनांना पांठीबा पत्रावर बोगस स्वाक्षरी
जिल्हाधिकारी आणि डाॅक्टर संघटनेचा वाद विकोपाला गेला असताना बुधवारी मात्र अनेक तहसीलदार,गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी यांनी आम्ही पांठीबा पत्रावर स्वाक्षरी केलीच नाही.आमच्या बोगस सह्या करण्यात आल्याचे अनेक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे डाॅक्टरांना जाहिर केलेल्या पांठीबा वर नेमकं सह्या केल्या कोणी आणि कशासाठी अशा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
दरम्यान डाॅक्टर,तहसीलदार,मुख्याधिकारी,गटविकास अधिकारी आणि नायब तहसीलदार यांनी कोरोना संकटाचे उल्लंघन करून अधिकारी व कर्मचारी यांनी विना परवानगी मोर्चा मध्ये जमाव जमवून कोविड-१९ चे नियम धाब्यावर बसवल्याने त्यांना तात्काळ सेवामुक्त करून त्यांच्या वर फौजदारी दाखल करण्याची मागणी जगदीश नरवाडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या विरोधात डाॅक्टर सह आदी संघटना एकत्र येवून एल्गार पुकारल्या नंतर बुधवारी मात्र हजारो सामजिक सह राजकीय संघटना जिल्हाधिकारी सिंह यांच्या समर्थनात पुढे आल्याचे दिसून आले.यवतमाळ शहरातील अनेक जागृत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सिंह यांना पांठीबा देत थेट मुख्यमंत्री,पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन पांठीबा जाहीर केला आहे.



