यवतमाळ: मारेगांव तालुक्यातील हिवरा(मजरा) येथील एका ३५ वर्षीय विधवा महिलेने विहीरीत घडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. तिच्या आत्महत्याने तिचे दोन फुला सारखे मुलं उघड्यावर पडले आहे.
विधवा महिले कडे नागरिकांचा पाहिण्याचा दृष्टिको अतिशय नकारात्मक आहे. "ती" किती ही चांगली राहीली तरी ही लोकांचा पाहण्याचा कल वाईटच असतो. कदाचित या 'माऊली'वर देखील तीच वेळ आल्याने तिने जीवन संपविला असावा? या घटनेतील विधवा महिला आणि मृतक संगिता नामदेव खापणे वय ३५ वर्ष पती नामदेव याचा आठ वर्षांपूर्वी निधन झाल्याने तेव्हा पासून मृतक माहेरीच राहत होती.
मृतक संगिता खापणे हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संगिताच्या जाण्याने 'ती' दोन्ही फुल पाखरू उघड्यावर पडले आहे. त्यामुळे दोन मुलांचा सांभाळ कोण करणार अशा प्रश्न नातेवाईक सह गावातील नागरिकांना पडला आहे. संगिता हिने नेमका आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीसांनी करण्याची मागणी होत आहे.
