Breaking

Post Top Ad

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

६० हजारांच्या वर निगेटिव्ह तर पुन्हा २३६ जण पॉझिटीव्ह

 

६० हजारांच्या वर निगेटिव्ह तर पुन्हा २३६ जण पॉझिटीव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. आज दिवसभरात आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले ११५ जण ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६१४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ६० हजार ७२८ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.


बुधवार दि.२३ सप्टेंबर ला सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून यात नव्याने २३६ रुग्णांची भर पडली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६८ वर्षीय व ७२ वर्षीय पुरुष तसेच ६१ वर्षीय महिला, उमरखेड शहरातील ५० वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला, दिग्रस शहरातील ५० वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 


नव्याने पॉझिटीव्ह  आलेल्या २३६ जणांमध्ये  पुरुष १५४ आणि महिला ८३ आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष ४८ व ३० महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष, आर्णी शहरातील आठ पुरुष व चार महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सात महिला, महागाव शहरातील १२ पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील ११ पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील नऊ पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, राळेगाव शहरातील आठ पुरुष व पाच महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील २२ पुरुष व १२ महिला, वणी शहरातील आठ पुरुष व दोन महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, कारंजा शहरातील एक पुरुष तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या एका पुरुषाचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६९४८९ नमुने पाठविले असून यापैकी ६८३५० प्राप्त तर ११३९ अप्राप्त आहेत. तसेच ६०७२८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ७२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७६२२ झाली आहे. यापैकी ६१४० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २३० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७४ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad