Breaking

Post Top Ad

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

नऊ जणांचा मृत्यू: नव्याने २१५ जण पॉझिटीव्ह


नऊ जणांचा मृत्यू: नव्याने २१५ जण पॉझिटीव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला तर २१५ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले २३० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


जिल्हातील सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे.शासना आणि प्रशासना कडून युद्ध पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.मात्र नागरिक कोरोना ला गांभीर्याने घेत नसल्याने दररोज कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहे.अशा भयंकर प्रस्थितीत नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन कोरोना वर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७०४०४ नमुने पाठविले असून यापैकी ६९६०७ प्राप्त तर ७९७ अप्राप्त आहेत. तसेच ६१७६६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ३१ वर्षीय, ४६ वर्षीय, ५६ वर्षीय आणि १७ वर्षीय पुरुष तर तालुक्यातील १९ वर्षीय महिला, उमरखेड शहरातील ५० वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील ५६ वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील ५७ तसेच ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.  नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये  पुरुष १३५ व ८० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष ३३ व १६ महिला, यवतमाळ तालुक्यातील चार पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील १० पुरुष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील १२ पुरुष व आठ महिला, कळंब शहरातील ११ पुरुष व १० महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील १३ पुरुष व आठ महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व चार महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, घाटंजी शहरातील पाच पुरुष व पाच महिला, केळापूर तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील सहा पुरुष व एक महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील सहा पुरुष व सात महिला, पांढरकवडा शहरातील आठ पुरुष व दोन महिला, राळेगाव शहरातील एक महिला, राळेगाव तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, वणी शहरातील नऊ पुरुष व चार महिला पॉझिटीव्ह आहेत.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ७०२ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७८४१ झाली आहे. यापैकी ६३७० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २३९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७२ जण भरती आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad