'वाघा'च्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव लक्ष्मी भीमराव दडांजे वय ६८ वर्ष असे आहे. हल्यात ठार झालेली महिला शेतात निंदन करीत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे 'ती' जागीच ठार झाली. काही दिवसा पुर्वी याच परिसरात वाघाने मोठी दहशत निर्माण केली असताना राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दहशत निर्माण करणाऱ्या 'वाघां'चे तातडीने बंदोबस्त करण्याचे निर्देश वन विभागाला दिला होता.
अंधारवाडी, वारा कवठा या भागात नेहमी वाघाचा वावर असते. यापुर्वी सुध्दा वाघाने अनेक नागरिकांवर हल्ले केले आहे. मात्र त्यात ते नशिबाने वाचले. वाघाने परिसरात अनेक गायी म्हशींवर हल्ले करून ठार मारल्याची घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या वाघाला पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गा कडून होत आहे. राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातीलच असल्याने या गंमीर विषया कडे लक्ष देतील का अशा सवाल या निमित्ताने नागरिकांमध्ये उपस्थितीत केल्या जात आहे.
