Breaking

Post Top Ad

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

चंद्रपुर जिल्हात कोरोना रूग्णांची संख्या ६२५

चंद्रपुर जिल्हात कोरोना रूग्णांची संख्या ६२५
चंद्रपूर, दि. ४ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात आणखी २८ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे ही संख्या आता ५९७ वरून ६२५ झाली आहे. यापैकी ३९६ कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली असून २२७ कोरोना बाधितावर सध्या चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दोन मृत्यू झाले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व संसर्गाच्या काळामध्ये शक्यतो घरीच रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज दि.४ ऑगस्ट  चंद्रपूर महानगरातून १२, बल्लारपूर शहरातून ५, ब्रह्मपुरी तालुक्यातून ३, भद्रावती तालुक्यातून ३, मूल शहरातून 1, सिंदेवाही तालुक्यातून २ राजुरा तालुक्यातून २ अशा एकूण २८ रुग्णांची नोंद गेल्या चोवीस तासात झाली आहे.

आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरातून बाबुपेठ परिसरातील २८ वर्षीय युवकाचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातून या युवकाने प्रवास केल्याची नोंद आहे. दुर्गापूर परिसरातील २० वर्षीय युवतीची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली असून प्रतिबंधात्मक क्षेत्रांमधील ही युवती आहे.

लहुजी नगर एमआयडीसी परिसरातील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिला व १४ वर्षीय मुलगा व मुलगी असे तिघेजण पॉझिटिव्ह ठरले आहे.अन्य जिल्ह्यात प्रवास करून आलेली जटपुरा वार्ड परिसरातील ३३ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेली ३५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.

नेताजी चौक बाबुपेठ येथील मुंबईवरून प्रवास केलेला ३९ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे. तर दुर्गापूर वार्ड नंबर २ मधील आझाद चौक येथील ३५ वर्षीय महिला संपर्कातून पॉजिटिव्ह ठरली आहे. याशिवाय मनोज गेट, आयप्पा मंदिर, जवळील २५ वर्षीय युवती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे.बंगाली कॅम्प परिसरातील पठाणपुरा सवारी बंगला, येथील ५७ वर्षीय पुरुष संपर्कातील रुग्णामुळे पॉझिटिव्ह ठरला आहे. तुकुम चंद्रपूर येथील पोलीस कल्याण हॉल जवळील ३१ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मुल येथील सोमनाथ रोड वार्ड नंबर ६, येथील महिलेचा समावेश आहे. या पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ही महिला आहे. बल्लारपूर तालुका व शहरातून पाच पॉझिटिव्ह पुढे आले आहे. यामध्ये शहरातील ७० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. बाहेरगावाहून प्रवास केल्याची या महिलेची नोंद आहे. बल्लारपूर नजीकच्या विसापूर येथील ३२ , ३३ व २१ वर्षीय तीन पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. बाहेर गाव वरून प्रवास करून आल्याची या तिघांची नोंद आहे.

बल्लारपूर शहरातील ४७ वर्षीय पुरुषांचा देखील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. अन्य शहरातून प्रवास केल्याची या व्यक्तीची नोंद आहे. भद्रावती तालुक्यातील ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये एकाच पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले ११ व १४ वर्षीय दोन मुले व ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली येथील एकाच कुटुंबातील ३ जण पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये दोन ५० वर्षे व एका २५ वर्षे पुरुषाचा समावेश आहे. या कुटुंबातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातून हे तिघे पॉझिटिव्ह झाले आहे.

राजुरा शहर व तालुक्यामध्ये संपर्कातून व बाहेरून प्रवास केलेल्या नागरिकांमधून पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरूच आहे. राणा वार्ड राजुरा येथील २८ वर्षीय पुरुष मुंबईवरून परत आल्यानंतर पॉझिटिव्ह ठरला आहे. तर तालुक्यातील दत्त मंदिर चुनाळा येथील ४९ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला. कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह ठरला आहे. अन्य जिल्ह्यातून प्रवास केल्याची नोंद असणाऱ्या सिंदेवाही येथील १८ वर्षीय युवती व ५० वर्षीय पुरुषाची नोंद पॉझिटिव्ह म्हणून झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad