Breaking

Post Top Ad

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

यवतमाळ जिल्हात पुन्हा ५६ जण पॉझिटीव्ह

यवतमाळ जिल्हात पुन्हा ५६ जण पॉझिटीव्ह
८० जणांची कोरोना वर मात; दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यु 
यवतमाळ, दि. ४ ऑगस्ट  : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युमध्ये दोन जणांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण मृत्युची संख्या ३४ झाली आहे. तर जिल्ह्यात आज (दि. ४ ऑगस्ट ) ५६ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ८० जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मंगळवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील फुलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील महावीर वॉर्ड येथील एक पुरुष, पुसद शहरातील तीन पुरुष व पुसद ग्रामीण मधील एक पुरूष, दिग्रस शहरातील श्रीरामपूर येथील एक पुरूष, दिग्रस  शहरातील पाच महिला व १३ पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील आंबेडकर चौक येथील एक पुरुष, काळे लेआऊट येथील एक पुरूष, कमला पार्क येथील एक पुरूष व एक महिला, संभाजीनगर येथील एक महिला, दर्डा नगर येथील एक पुरूष, उमरखेड शहरातील चार पुरुष व १३ महिला, आर्णी शहरातील ०३ पुरुष व ०२ महिला, नेर शहरातील एक पुरुष व एक महिला पॉझिटीव्ह आले आहेत.  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी ३६८ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत २०७८१ नमुने पाठविले असून यापैकी १६५४२ प्राप्त तर ४२३९  अप्राप्त आहेत. तसेच १५२५८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. 
जिल्ह्यात सोमवारपर्यंत ४६४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण होते. यात आज नव्याने ५८ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे हा आकडा ५२२ वर पोहचला. मात्र दोन जणांचा मृत्यु आणि ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ८० जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १२८४ झाली आहे. यापैकी ८१० जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ३४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४० जण भरती आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad