Post Top Ad
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
कर्नाटकात शिवरायांचा पुतळा हटवल्याने यवतमाळात शिवसैनिक आक्रमक
मुख्यमंत्री येदुयुरप्पाच्या विरोधात घोषणाबाजी, शिवरायांप्रति भाजपाचा आकस उजेडात आल्याची टिका
कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात गावक-यांच्या व ग्रामपंचायतीच्या संमतीने बसविलेला शिवछत्रपतींचा पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज यवतमाळात सुध्दा मोठया प्रमाणात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन आपला राग व्यक्त केला. स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुयरप्पा यांचे पोस्टरला चपला मारून व पोस्टर पायदळी तुडवून त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान शिवसेना पदाधिका-यांनी या प्रकरणामुळे भाजपाचा शिवरायांप्रती असलेला खरा आकस समोर आल्याची टिका केली आहे.
मनगुत्ती गावातील नागरीकांनी ठराव घेऊन शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने गावक-यांनी मोठया उत्साहात शिवरायांचा पुतळा बसविला. कर्नाटकातील भाजपा सरकारला गावक-यांनी घेतलेला निर्णय पचनी न पडल्याने त्यांनी पोलिस बंदोबस्त लाऊन महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा हटविला. ह्या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व कर्नाटक सरकारचीच आहे.कर्नाटक सरकारने पुतळा हटविल्यामुळे आता महाराष्ट्रात संतापाची एकच लाट उसळली आहे. यवतमाळ येथे सुध्दा आज दत्त चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे,जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांच्या नेत्रृत्वात शिवसैनिकांनी एकत्र येऊन आपला संताप व्यक्त केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुयरप्पायांचे पोस्टर हातात घेऊन, त्याला चपला मारून त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.संतापाच्या भरात पोस्टर पायदळी तुडवत शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापिही सहन करणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहे. मनगुत्ती गावातील नागरीकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने त्यापासून इतरांना प्रेरणा मिळत होती. मात्र शिवरायांप्रती आकस असलेल्या कर्नाटकातील भाजपा सरकारने पुतळा हटवून आपल्या निती आणि नियत मधील फरक दाखवून दिला.राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने येदुयरप्पा या सर्व प्रकाराला जबाबदार आहेत.हा सर्व प्रकार देशातील नागरीक आपल्या उघड्या डोळयाने बघत आहेत.महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवरायांचा अवमान कधीही सहन करणार नाही. याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना आम्ही करुन देऊ इच्छीतो.
पराग पिंगळे,शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ
शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. बेळगावात व कर्नाटकात सुद्धा शिवरायांनी खूप मोठे कार्य केले आहे. कर्नाटकात शिवरायांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जाणीवपुर्वक आकस ठेऊन शिवरायांचा झालेला हा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी दिला आहे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ भाजपला साथ म्हणणाऱ्या भाजपच्या मनातील शिवरायांप्रती असलेला आकस दिसून आला अशी टिका याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेनेचे निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे निवासी,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,तालुका प्रमुख संजय रंगे, जिल्हा संघटक व्यापारी आघाडी प्रवीण निमोदिया, सागरताई पुरी महिलाआघाडी जिल्हा समन्वयक, कल्पना दरवई महिला शहर संघटिका, अमोल धोपेकर उपजिल्हा प्रमुख युवासेना, बिल्ला सोळंकी शहर संघटक युवासेना, अनिल यादव, निलेश बेलोकर, गजानन इंगोले गटनेता शिवसेना नगर परिषद, रवी राऊत, पंकज देशमुख, योगेश भांदक्कर, संतोष चव्हाण, चेतन क्षीरसाठ, राजेंद्र कोहरे, गोलू जोमदे, पप्पू गजभे, डॉ नाईक, संगीता पुरी, गार्गी गिरडकर, अभिनव वाडगुरे, मंगेश भालेराव, हृषीकेश इलमे, शाम थोरात, शंकर देउळकर, शैलेंद्र तांबे, दीपक सुकळकर इत्यादी शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र#
Share This
About TeamM24
महाराष्ट्र
लेबल:
महाराष्ट्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response