Breaking

Post Top Ad

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात कोरोनाची प्रस्थितीत चिंताजनक : एकाच दिवशी आढळले १०१ पाॅझिटिव्ह रूण्ग

जिल्ह्यात कोरोनाची प्रस्थितीत चिंताजनक : एकाच दिवशी आढळले १०१ पाॅझिटिव्ह रूण्ग
जिल्हातील तमाम नागरिकांनी कोरोना संकट टाळण्यासाठी शासन व प्रशासने दिलेल्या सुचनाचे पालन करून कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.
यवतमाळ, दि. ८ ऑगस्ट  : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आज शनिवार ला यात नव्याने १०१ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले ९९ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील चिंतामणी नगर, वाघापूर येथील ६० वर्षीय पुरुष, नेहरू चौक येथील ६५ वर्षीय पुरुष आणि पुसद तालुक्यातील इसापूर येथील ७८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या १०१ रुग्णांमध्ये ५९ पुरुष व ४२ महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील १४ पुरुष व ११ महिला, पुसद ग्रामीण भागातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा ग्रामीण भागातील तीन पुरुष व पाच महिला, घाटंजी तालुक्यातील एक महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस शहरातील आठ पुरुष व पाच महिला, यवतमाळ शहरातील अकरा पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील एक महिला, उमरखेड शहरातील १४ पुरुष व पाच महिला, उमरखेड ग्रामीण भागातील दोन महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, नेर तालुक्यातील एक महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ९९ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३६ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १४९१ झाली आहे. यापैकी १११४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ४१ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ११९ जण भरती आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत २५४४५ नमुने पाठविले असून यापैकी २२४५८  प्राप्त तर  २९८७ अप्राप्त आहेत. तसेच २०९६७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad