Breaking

Post Top Ad

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

चिंता वाढली नव्याने १०४ पॉझिटीव्ह

चिंता वाढली नव्याने १०४ पॉझिटीव्ह यवतमाळ, दि. १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आज नव्याने १०४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली तर  दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृत झालेल्यामध्ये दारव्हा येथील आठवडी बाजार परिसरातील ५६ वर्षीय पुरुष आणि पुसद येथील खतीब वॉर्डातील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच २४ तासात १७६ जणांना सुट्टी देण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३७३२३ नमुने पाठविले असून यापैकी ३६८४४ प्राप्त तर ४७९ अप्राप्त आहेत. तसेच ३४५०२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्या १०४ जणांमध्ये ५४ पुरुष आणि ५० महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील सेवानगर येथील एक पुरूष दोन महिला, शर्मा लेआऊट येथील एक पुरूष व दोन महिला, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक महिला, शारदा चौक येथील एक पुरूष, शिवनेरी सोसायटी येथील दोन महिला, शहराच्या इतर भागातील २७ पुरूष व २५ महिला, दिग्रस शहरातील १४ पुरूष व १३ महिला, गवळीपुरा दिग्रस येथील एक महिला, पुसद शहरातील तीन पुरूष, मोती नगर येथील एक पुरूष, पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक पुरूष, कळंब येथील चार पुरूष व चार महिला, उमरखेड येथील एक पुरूष यांचा समावेश आहे. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५७३ असून होम आयसोलेशनमध्ये १३१ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २३४२ झाली आहे. यापैकी १५७८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४० जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad