![]() |
| पांढरकवडा शहरातील ओस पडलेले रस्ते |
रविवारी पॉझिटीव्ह आलेल्या ३० जणांमध्ये २२ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे. यात नेर शहरातील १२ पुरुष व चार महिला, उमरखेड शहरातील १० पुरुष व तीन महिला आणि वणी शहरातील एक महिला पॉझिटीव्ह आली आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत ४२५ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण होते. यात रविवारी ३० नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ४५५ वर पोहचला. मात्र 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ६१ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३९४ आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ११४५ झाली आहे. यापैकी ७२२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ११५ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी २२४ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत १९००८ नमुने पाठविले असून यापैकी १५१४८ प्राप्त तर ३८६० अप्राप्त आहेत. तसेच १४००३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
