Breaking

Post Top Ad

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात कोरोनाचे ११० जण पॉझिटीव्ह

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी  दिवसभरात ११० रुग्णांची भर पडली तर दोघांचा रूग्णांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला.  जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन आकडी रूग्णांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र जिल्हाधिकारी एम.डी.सिंह जिल्ह्यातील नागरिकांना धीर देण्याच्या दृष्टीने थेट कोरोना रूग्णांसोबत संवाद साधत असून अनेक तालुक्यात दररोज दौरे करित आहे
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी  दिवसभरात ११० रुग्णांची भर पडली तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन आकडी रूग्णांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र जिल्हाधिकारी एम.डी.सिंह जिल्ह्यातील नागरिकांना धीर देण्याच्या दृष्टीने थेट कोरोना रूग्णांसोबत संवाद साधत असून अनेक तालुक्यात दररोज दौरे करित आहे

यवतमाळ : जिल्ह्यात दिवसभरात ११० नवीन पॉझिटीव्ह रुग्ण्‍ा आढळले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ३१ जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील एक पुरुष व एक महिला आहे. ४३ वर्षीय पुरुष हा २३ ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला ताप व सर्दी होती. आज दुपारी त्याचा मृत्यु झाला. तर यवतमाळ शहरातील ४४ वर्षीय महिला २१ ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. तिला आठ दिवसांपासून खोकला होता. तसेच तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे २४ ऑगस्टच्या रात्री तिचा मृत्यु झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी १७९ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४३८७३ नमुने पाठविले असून यापैकी ४२६३४ प्राप्त तर १२३९ अप्राप्त आहेत. तसेच  ३९८१० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

२४ तासात जिल्ह्यात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ११० जणांमध्ये ६९ पुरुष आणि ४१ महिला आहेत. यात यात महागाव तालुक्यातील पाच पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील २७ पुरुष व १२ महिला, वणी शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील सात पुरुष व चार महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, घाटंजी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, पुसद शहरातील आठ पुरुष व आठ महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील १० पुरुष व सात महिला तसेच इतर ठिकाणच्या एका महिलेचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६६३ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर २१२ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २८२४ झाली आहे. यापैकी १८८१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ६८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १८१ जण भरती आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad