लॉकडाऊन मुळे बाजारपेठेत शुकशुकाट

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने प्रशासनानं ६ तालुक्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. आजपासून यवतमाळ, दारव्हा, नेर व पांढरकवडा येथे संचारबंदी लागू झाली असून पुसद व दिग्रस तालुक्यांमध्ये चार दिवसांपूर्वीच संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी सर्व बाजारपेठा, भाजीपाला मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहे. दवाखाने व औषधी दुकानांना मुभा असून बँका ग्राहकांसाठी बंद आहे. त्यामुळं शहरात शुकशुकाट असून बाजारपेठ निर्मनुष्य झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांव्यतिरिक्त ईतर कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. घराबाहेर पडणाऱ्यांची कसून चौकशी केल्या जात असून अनावश्यक बाहेर दिसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई पोलिसांकडून केल्या जात आहे. पोलिसांची गस्त देखील सुरू असून रहिवासी वस्तीत टोळक्याने कुणी आढळल्यास त्यांना पोलिसांचे दंडुके देखील बसत आहे. राज्यात सुरवातीलाच यवतमाळ शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. मात्र त्यानंतर प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या एक अंकी आकड्यावर आली होती परंतु आता पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावला आहे, ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अडीचशे च्या घरात पोहोचली आहे, जिल्ह्यात २३ मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ६ तालुक्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन चा निर्णय घेतला आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने