‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 21 जणांना सुट्टी एकाचा मृत्यु ; 14 जण नव्याने पॉझेटिव्ह
यवतमाळ : जिल्ह्यात रोज
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतांनाच 21 जणांनी
कोरोनावर मात केली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले
21 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून
सुट्टी देण्यात आली. तर आज (दि.17) जिल्ह्यात एका
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 14 जण नव्याने
पॉझेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यु झालेली
व्यक्ती ही 70 वर्षीय पुरुष असून पुसद येथील ज्योती नगरातील रहिवासी
आहे. ते 13 जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले
होते. तसेच जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये
नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.
यवतमाळ शहरातील डोर्लीपुरा (पाटीपूरा)
येथील एक पुरुष, भोसा येथील सारस्वती ले-आऊट येथील एक पुरुष,
यवतमाळ येथील दोन महिला, पुसद शहरातील गायमुखी नगर येथील एक पुरुष, पुसद
शहरातील संभाजी नगर येथील दोन महिला, पुसद शहरातील खाटीक
वॉर्ड येथील दोन पुरुष, उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 1
येथील पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील गांधी नगर
येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील एक महिला
पॉझेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात कालपर्यंत (दि.16) 152 ॲक्टीव्ह
पॉझेटिव्ह होते. यापैकी एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या 151 वर आली. तसेच जिल्ह्यात आज 14 नवीन पॉझेटिव्ह
आल्याने हा आकडा 165 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 21 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची
संख्या 144 आहे.
यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील
चाचणीद्वारे 99 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह
आलेले 45 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण
पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 517 एवढी आहे. यापैकी 357
जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर
जिल्ह्यात 16 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन
वॉर्डात 132 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने
शुक्रवारी 58 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून
आतापर्यंत महाविद्यालयाने 8624 नमुने पाठविले असून यापैकी 8520
प्राप्त तर 104 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8003
नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय
महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे