मुंबई:- सुशांत सिंग राजपूत एक अतिशय उमद्या आणि तरुण अभिनेत्याने आयुष्याच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुशांत वांद्रे येथील घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी रविवारी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण देश सु"शांत"झाला. खरं तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने कमी वेळात चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
सुशांतच्या आत्महत्या ने बॉलिवूड, सामाजिक-राजकीय कलावंत या क्षेत्रातील सर्वांना मोठा धक्का बसला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आदी लोकप्रिय कलाकारांनी व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहे.
|
सुशांत सोबत रिया |
मैत्रीण रिया ला अश्रु अनावर...
नैराश्य मधून जिंवन संपवणाऱ्या सुशांत सिंग ची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अश्रू अनावर झाले होते.रिया च्या आधी अंकिता लोखंडे हिच्या सोबत ब्रेकअप झाल्यावर सुशांत रिया सोबत रिलेशनशी मध्ये असल्याचे वृत्त आहे.गेल्या अनेक दिवसा पासून रिया आणि सुशांत सोबत राहत होती अशी चर्चा आहे.
सुशांत सिंग याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर शेवटच्या पोस्टमध्ये तिच्या आईचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्याने 'माॅ' असे लिहिले होते व आयुष्याला क्षणभंगुर म्हटले होते. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर सुशांतची रात्रीची पोस्ट चर्चेत आली. सुशांत सिंग राजपूत च्या चाहत्यांना आणि त्याला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने आत्महत्या केली यावर अद्यापही विश्वास बसत नाही.
आत्महत्या नंतर त्याचा मृत्युदेह शवविच्छेदन करण्यासाठी कपूर रूग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, सुशांतचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले असून सोमवारी चार वाजता विलेपार्ले येथील हिंदू समशान भूमित सुशांत च्या पार्थिव वर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोजकेच नातेवाईक हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response