Breaking

Post Top Ad

मंगळवार, ३० जून, २०२०

विधवा महिलांना मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप

विधवा महिलांना मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप
परभणी- वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गरीब,गरजू विधवा महिलांना मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप करण्यात आले. वंचितच्या राज्य सचिव डॉक्टर विजया चव्हाण व धर्मराज चव्हाण यांच्या हस्ते या धान्याचे वाटप करण्यात आले. अनेक गरजू महिलांनी याचा लाभ घेतला.

पतीच्या मृत्यूनंतर  समाजात एकाकी पडलेल्या महिलांना बर्‍याचदा कोणाचाही आधार मिळत नाही, अनेकांना तर काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र लॉकडाउनच्या काळात कामही बंद असल्याने अनेक विधवा महिलांची उपासमार होऊ लागली. याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य सचिव डॉक्टर विजया चव्हाण यांनी या महिलांना तीस किलो गहू, तीस किलो तांदूळ, पाच किलो साखर व अन्य गरजोपयोगी वस्तूंचे वाटप केले. जिल्हा संपर्क कार्यालय धन्वंतरी हॉस्पिटल या ठिकाणी या धान्यांचे वाटप करण्यात आले. 

डॉक्टर धर्मराज चव्हाण, परभणी जिल्हा महासचिव सुभाष सोनवणे, राज्य समन्वयक अरुण गिरी, कैलास कांबळे व रत्नमाला भारशंकर हे यावेळी उपस्थित होते. परभणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना गरजोपयोगी वस्तू व धान्याचे वाटप करण्यात आले होते. सलग तीन महिने हे वाटप करण्यात येत आहे. मात्र समाजाचाच एक भाग असलेल्या विधवा महिलांकडे दुर्लक्ष झाले, ही बाब लक्षात येताच त्यांना ही मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप करण्यात आले. अनेक महिलांनी वंचितच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad