बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी मुंबईतील वांद्रे मधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
सुशांतसिग यांनी पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. आत्महत्या करण्या मागचे नेमकं कारण काय आहे हे अजून तरी पुढे आलेलं नाही. दूरचित्रवाणी माध्यमातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांत ने २०१३ साली 'काय पोछे" ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.
त्यामुळे सुशांतला सर्वोत्तम पदार्पणासाठी चा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा जन्म २१ जानेवारी १९८० रोजी बिहार राज्यातील पटना या शहरात झाला होता. त्यांनी एम. एस. धोनी:द अनटोल्ड स्टोरी, राब्ता, केदारनाथ, छिछोरे आदी चित्रपटात अभिनय केला आहे.
गेल्या काही महिन्याच्या काळात बॉलीवूड मधील अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला आहे. त्यात दर्जेदार अभिनयासाठी नावलौकिक मिळविलेले सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या घटनेने केवळ मनोरंजन क्षेत्रातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली आहे.