नियोजन हवंच ! ३० हजार पगारातसुद्धा जमवा

लाखोंचा फंड, जाणून घ्या 'बजेटिंग फॉर्म्युला’

मुंबई : कमी पगार म्हणजे मर्यादित स्वप्नं, अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण योग्य नियोजन आणि स्मार्ट गुंतवणुकीने ३० हजार रुपयांच्या पगारातही लाखो रुपयांचा निधी तयार करता येतो, हे एका उदाहरणावरून स्पष्ट होते. 'अमोल”एक साधा नोकरदार पण त्याने एक सोपा प्रभावी बजेटिंग फॉर्म्युला अवलंबून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.

अमोल दरमहा ३० हजार रुपये पगार कमावतो. त्याने जुन्या ५०-२०-३० पद्धतीत थोडा बदल करून ५०-२५-२५ फॉर्म्युला अवलंबला. या नियोजनानुसार तो पगाराचे तीन भाग करून खर्च, आनंद आणि गुंतवणूक यांचा योग्य समतोल राखतो.

५०% म्हणजे १५ हजार रुपये आवश्यक खर्चासाठी

यात तो घरभाडे (₹७,०००), किराणा (₹३,५००), वीज-पाणी (₹२,०००), प्रवास (₹१,५००) आणि इतर आवश्यक वस्तू (₹१,०००) अशा पद्धतीने काटेकोरपणे व्यवस्थापन करतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या शेवटीही बचत आणि गुंतवणुकीसाठी पुरेसा निधी उरतो.

२५% म्हणजे ७,५०० रुपये  स्वतःच्या आनंदासाठी

तो मानतो की पैसा फक्त उदरनिर्वाहासाठी नाही, तर आनंदासाठीही असतो. त्यामुळे तो स्कूटरचा ईएमआय (₹३,०००), विकेंड डिनर आणि सुट्ट्या (₹१,०००), वार्षिक सहलीसाठी बचत (₹२,५००) आणि पुस्तके वा वैयक्तिक छंदांसाठी (₹१,०००) निधी राखून ठेवतो. “आनंद गमावून श्रीमंती मिळवण्यात अर्थ नाही,” हे त्याचे धोरण आहे.

२५% म्हणजे ७,५०० रुपये गुंतवणुकीसाठी

याच भागातून राजेशने स्मार्ट फिनान्शियल प्लॅनिंग केले आहे.

तो दरमहा ₹२,००० आपत्कालीन फंडात, ₹१,००० आरोग्य विम्यात, ₹१,००० टर्म इन्शुरन्समध्ये आणि उर्वरित ₹३,५०० म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये गुंतवतो. १२% वार्षिक परताव्यानुसार ही गुंतवणूक ५ वर्षांत सुमारे ₹२.८ लाखांपर्यंत वाढू शकते.

अमोलकडून शिकण्यासारखे म्हणजे, कमी पगार असूनही आर्थिक शिस्त आणि संतुलन. तो आनंदावर काटकसर करत नाही, पण प्रत्येक रुपयाचा योग्य हिशेब ठेवतो. आजच्या तरुणांसाठी हे उदाहरण प्रेरणादायी आहे. कारण बजेटिंग म्हणजे आनंदाला तिलांजली नव्हे, तर हुशारीने जगण्याची कला आहे. थोडं नियोजन आणि सातत्य ठेवलं, तर ३० हजार पगारातही भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करता येऊ शकत





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने