महाराष्ट्रा24। आलीकडेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस पहायला मिळाली.अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.त्यातच गेल्या कित्येक वर्षांपासून सहकार क्षेत्रात पकड असलेल्या दिग्रस बाजार समितीत माजी मंत्री संजय देशमख यांचे वर्चस्व कायम राहिले आणि मंत्री संजय राठोड यांना 'मोठा झटका' अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या.खरतर मंत्री राठोड यांचे दिग्रस तालुक्यातील सहकार क्षेत्रात फकड नसताना काही जागांवर राठोड गटाचे उमेदवार विजयी झाले.दिग्रस वगळता इतर ठिकाणी मंत्री संजय राठोड यांची जबरदस्त कामगिरी दिसून आली.
सहकार क्षेत्रातील राजकारण हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी सोबत गणित जोडता येत नाही.मंत्री संजय राठोड ह्यांनी त्यांच्या दारव्हा,दिग्रस,नेर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत.त्यामुळे मंत्री राठोड यांची लोकप्रियता वाढली आहे.विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात सामिल झाले.त्यानंतर आता मंत्री संजय राठोड संपले अशा विविध चर्चा राजकारणात सुरू आहेत.परंतू स्थानिक मतदार आणि नागरिकांना कोण कुठे गेला,त्यापेक्षा आजी लोकप्रतिनिधींनी मतदार संघाचा किती विकास केला हे छाती ठोकून सांगत आहे.त्यामुळे मंत्री संजय राठोड कोणत्याही पक्षात गेले तरी त्याचा परिणाम त्यांच्या मतांवर पडणार नाही,असे चित्र सध्या तरी दारव्हा,दिग्रस,नेर विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
राज्याचे मंत्री आणि दारव्हा,दिग्रस,नेर मतदारसंघाचे आमदार संजय राठोड हा वेगळा रसायन आहेत.नेता म्हणुन त्यांच्या डोक्यात कधी हवा गेली नाही.कितीही लहान व्यक्ती असेल तर त्याला रिप्लाय देणार हा सच्चा कार्यकर्ता म्हणुन मंत्री संजय राठोड यांची नागरिकांमध्ये ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून तर येणारच पण लोकसभाचा उमेदवार संजय राठोड निवडून आणतील अशा विश्वास भाजप हायकमांडला आहेत.मंत्री संजय राठोड सारखा नेता भाजपला पाहिजे त्या अनुषंगाने भाजपने राठोडांना भाजप मध्ये आणण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

