कवडीचा अभ्यास नसलेला आणि फक्त लोकांकडून 'दे पाचशे' घेऊन त्रास देणाऱ्या त्या तोतया पत्रकारामुळे आर्णी शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे हा महारथी व्हाॅट्सअप वर रात्री दरम्यान दारूच्या नशेत वाटेल ती पोस्ट टाकत असल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने आलीकडेच आर्णी पोलीसांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन त्या तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहेत.
त्या तोतया पत्रकारांवर आर्णी पोलिसात अपराध क्रमांक १२५/२००१ कलम ३०७,३४ भादवीचा गुन्हा नोंद असून अपराध कलम ३८५,२९४,३४ भादवी सह आदी स्वरूपाचे गुन्हे त्याच्या दाखल आहेत.
'आर्णी विचारमंच' या व्हाॅट्सअप ग्रुपवर एका प्रतिष्ठित व्यक्ती विरोधात बदनामीकारक पोस्ट लिहिल्या नंतर शहरात चांगलेच वातावरण तापले होते.अनेकांनी शब्दांचा मार दिल्यानंतर हा तोतया पत्रकार थेट त्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे जाऊन त्याचे पाय धरून माफी मागितली.विशेष म्हणजे त्या प्रतिष्ठित व्यक्तीचे बंधू उच्च न्यायालयात वकील म्हणुन काम करतात.त्यामुळे घाबरलेल्या तोतया पत्रकाराने लोळून माफी मागितली होती.सध्या तो नावाला असलेल्या पब्लिक पोस्ट याचा पत्रकार सांगतोय.अनेक वेळा जीहूजूर जीहूजूर अर्थात वाह वाहच्या बातम्या ची पोस्ट बनवून आपणच खरे पत्रकार असल्याची हवा तो करतोय.
