महाराष्ट्र24 । मुंबई: माजी मंत्री मनोहराव नाईक यांचे सुपूत्र तथा राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनिल नाईक यांना लवकरच राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागणार असल्याची माहिती पुढे येतेय.
गेल्या काही महिन्यापासून जिल्हाला बाहेर जिल्ह्याचा पालकमंत्री दिल्याने शेतकरी सह नागरिकांचे कामे होत नसल्याची ओरड आहे. त्यातच माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. त्यामुळे बंजारा समाजाला प्रतिनिधित्व पासून महाविकास आघाडी सरकार लांब ठेवतेय का अशा प्रश्न समाजात उपस्थितीत होत असल्याने राष्ट्रवादीचे युवा आमदार इंद्रनिल नाईक यांना ठाकरे सरकार मध्ये राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहाटे तीन वाजता पुसदच्या बंगल्यात भेट दिल्याने जिल्ह्याचा राजकारण ढवळून निघालाय. आमदार रोहित पवार हे दि.१९ ऑक्टोबर ला पहाटे पुसद मध्ये दाखल झाले. तद्नंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मनोहराव नाईक यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिड तास राज्याच्या राजकारणावर चर्चा झाली.
माजी मंत्री मनोहराव नाईक आमदार रोहित पवार आणि यांच्यात चर्चेदरम्यान आमदार इंद्रनिल नाईक यांना लवकरच मोठी जवाबदारी देण्या संदर्भात पवारांनी म्हटल्याचे सांगितल्या जातं. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे सरकार मध्ये आमदार इंद्रनिल नाईक मंत्री झाल्यास नवल वाटू नये अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे.