गेल्या १५ दिवसापासून नव्या कृषी कायद्या विरोधात दिल्ली आणि परिसरात पंजाब,हरियाणा आणि राजस्थान येथील शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संपुर्ण भारत बंदची हक्क दिली.त्यामुळे भारत बंद ला उत्स्फूर्त पांठीबा जिल्ह्यात पाहायला मिळाला.
आर्णी येथे मात्र भारत बंद ला अनोख्या पध्दतीने पांठीबा देण्यात आला.येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते आणि पदधिकाऱ्यांनी शहरातील मेन रस्त्याने भव्य रॅली काढली.दरम्यान शिवनेरी चौक येथे कवी आणि शेतकरी विजय ढाले यांनी शेतकऱ्यांवर कवी म्हणत अनोखा पांठीबा दिला.