यवतमाळ : जिल्ह्यात गुरूवारी गत चोवीस तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ४६ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय व ३१ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ५४ वर्षीय पुरूष व दारव्हा शहरातील ७७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७५५४६ नमुने पाठविले असून यापैकी ७४७८५ प्राप्त तर ७६१ अप्राप्त आहेत. तसेच ६६२०२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये पुरुष २६ व महिला २० आहेत. यात यवतमाळ शहरातील दोन पुरुष व चार महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील पाच पुरुष व चार महिला, पुसद शहरातील तीन पुरुष व पाच महिला आणि उमरखेड शहरातील एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २१९ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणाऱ्यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८५८३ झाली आहे. जिल्ह्यात २६८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २६२ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response