नागपूर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर आज दि.४ सप्टेंबर रोज शुक्रवारी साडे पाच वाजता दरम्यान जवळ नजिक उडाण पुलावर दुकाचीला अपघात झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.
यवतमाळ वरून आर्णी कडे येणाऱ्या दुचाकीला नागपूर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील जवळ नजिक उडाण पुलावर अपघात झाला. यात साखरा ता.दिग्रस येथील २१ वर्षीय युवक सुरेश भोपिचंद जाधव हा जागीच ठार झाला. घटने नंतर आर्णी येथील काही सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले मात्र दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने त्यांचाही नाईलाज झाला. मृतक सुरेश हा दुचाकी क्रमांक एम.एच.ए.सी.२९ १३७१ ने आर्णी कडे येत होता. त्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला जवळ येथील महामार्गावरील उडाण पुलावर अपघात झाला.
हा अपघात एवढा जबरदस्त होता की, मृतक सुरेश जाधव यांच्या डोक्याला आणि गुडघा मोडला होता. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने मृतक सुरेश जाधव हा जागीच ठार झाला. नागपूर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग हा चौपदरी झाल्याने प्रवासाला अडथळा येत नाही, मात्र महामार्गावरून वाहण चालवताना वाहनाचा वेग मोठ्या प्रमाणात राहत असल्याने यात कळत नकळत अपघात झाला तर जागीच ठार होण्याच्या घटना वाढत आहे. त्या अनुषंगाने वाहण सुरक्षित पणे चालवण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response