`शिवभोजन थाळीच्या दर्जाची तपासणीʼ

`शिवभोजन थाळीच्या दर्जाची तपासणीʼ
चंद्रपूर,दि.१ ऑगस्ट: जिल्ह्यामध्ये २२ ठिकाणी शिवभोजन केंद्रे असून गरीब, गरजू नागरिकांना पाच रुपयात शिवभोजन थाळी मिळत आहे. शिवभोजन थाळीतील अन्नपदार्थाच्या दर्जाची पुरवठा विभागाअंतर्गत तपासणी करण्यात येत असते. चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील रमाबाई महिला बचत गटा अंतर्गत चालणाऱ्या शिवभोजन केंद्रातील अन्न निकृष्ट असल्याची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी सोनटक्के व पुरवठा निरीक्षक प्रितम पवार यांनी केंद्राची तपासणी करून अन्नाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे.

घुग्घुस येथील शिवभोजन केंद्राचे काम रमाबाई महिला बचत गटाच्या सचिव सुनंदा लिहीतकर सांभाळत आहे. तपासणीअंती नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर प्रदर्शित केलेले नाही. केंद्रातील सुरक्षेच्या बाबी दिसून आल्या नाहीत. तसेच कच्चे अन्न पदार्थाचे खरेदी केले तपासणीच्या वेळी उपलब्ध आढळून आले नाही.

यावेळी शिवभोजन केंद्रातील थाळी घेणाऱ्या नागरिकाचे बयान नोंदवून घेतले असता घुग्घुस येथील शिवभोजन केंद्रातील अन्न निकृष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे थाळीतील अन्नाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे,अशी माहिती तालुका पुरवठा कार्यालयाने दिली आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने