यवतमाळ मध्ये पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ७०८ वर

यवतमाळ मध्ये पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ७०८ वर

यवतमाळ: शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या २३ झाली आहे. तर आज  जिल्ह्यात १९ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटीव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

नागरिक बिनधास्त 
सध्या जिल्हात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना देखील नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येत असून शुक्रवारी यवतमाळ शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याने जणू काही दिवाळीचा बाजार आहे असे चित्र बाजारपेठेत दिसून येत होते.
शुक्रवारी मृत झालेली व्यक्ती ही ५० वर्षीय महिला असून त्या पुसद तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी होत्या. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १९ जणांमध्ये १५ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील वसंत नगर येथील एक पुरुष, प्रभात नगर येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील खडसा येथील एक पुरुष, महागाव येथील सहा पुरुष व दोन महिला, उमरखेड येथील एक महिला, पुसद शहरातील वसंत नगर येथील एक महिला, घाटंजी येथील तीन पुरुष, नेर तालुक्यातील मोझर येथील एक पुरुष पॉझिटीव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात गुरुवारपर्यंत २१९ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह होते. यात शुक्रवारी १९ जणांची भर पडल्याने हा आकडा २३८ वर पोहचला. मात्र एकाचा मृत्यु झाल्याने आणि ‘पॉझिटीव्ह  टू निगेटिव्ह’ झालेल्या ३ जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २३४ झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे १५९ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटीव्ह आलेले ७५ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७०८ झाली आहे. यापैकी ४५१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण २३ मृत्युची नोंद आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज ६६ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ११५५७ नमुने पाठविले असून यापैकी १०९३० प्राप्त तर ६२७ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात १०२२२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने