जगाला कोरोना आंदन म्हणुन दिलेल्या देशात पुरूषांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे शास्त्रज्ञ यांनी महिलांना अनेक नवरे करण्याचे सल्ला देण्यात आले आहे.
अख्खा जग सध्या कोरोना या महामारी संकटाशी सामना करित आहे.सामना करण्याची वेळी चीन या देशाने आणली.मात्र चीन मध्ये एका महिलेने अनेक नवरे करावेत,अशी मागणी होताना दिसत आहे.चिनी अर्थशास्त्रज्ञ यी कांग एनजी यांनी हा सल्ला दिला आहे.
यी कांग हे फूदान विद्यापीठाचे प्राध्यापक असून त्यांच्या म्हणण्यानुसार,पुरूषांच्या वाढत्या संख्येमुळे अविवाहित पुरूषांमध्ये तीव्र स्पर्धा होईल.त्यामुळे महिलांनी अनेक नवरे करण्याचा सल्ला त्यांनी दिल्याने चीन मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
चीन या देशात सध्या लैंगिक असमानता प्रचंड वाढत आहे.पुरूषांचा जन्मदर मोठ्या प्रमाणात असल्याने महिलांची संख्या त्या तुलनेत फार कमी आहे.अशीच प्रस्थितीत राहीली तर येत्या पाच वर्षात चीनमध्ये तीन कोटी पुरूष अविवाहित राहतील अशी शक्यता आहे. Sopya Bhashet