बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नेहमीच चर्चेत असते. ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असून, तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील नातेसंबंधांबद्दल चर्चा सुरू आहेत. अशातच ऐश्वर्या रायने पहिल्यांदाच सासू जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याशी असलेल्या नात्याबाबत उघडपणे भाष्य केले आहे.
एका जुन्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय म्हणाली की, “त्यांची आई (जया बच्चन) माझ्यासाठी आईसारखी आहे. ज्या पद्धतीने मला या कुटुंबात स्वीकारण्यात आलं आणि प्रेम दिलं, त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.” या मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता. लग्नाच्या आधीच ऐश्वर्याने जया बच्चन यांच्याबद्दल आदराने बोलताना आपले विचार मांडले होते.
ऐश्वर्याने पुढे सांगितले की, “बच्चन कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रेमळ आणि आदर देणारा आहे. त्यांच्या मूल्यांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे.” तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा बच्चन कुटुंबातील संबंधांबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन ही आपल्या व्यावसायिक आयुष्याइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहते. ती मुलगी आराध्या बच्चनसोबत वारंवार सार्वजनिक ठिकाणी दिसते, मात्र बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांसोबत ती क्वचितच दिसते. त्यामुळेच तिच्या आणि जया बच्चन यांच्या नात्यावर अनेक अफवा उठल्या होत्या.
तथापि, या मुलाखतीतील ऐश्वर्याच्या वक्तव्यातून ती आपल्या सासूबाईंबद्दल किती आदर बाळगते हे स्पष्ट होते. अभिषेक बच्चनसोबत लग्नानंतर ऐश्वर्या रायने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ती एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात झळकली होती आणि पुन्हा तिची चर्चा झाली
