Breaking

Post Top Ad

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

कर्तव्याप्रती दक्ष असणारे असेही अधिकारी

कर्तव्याप्रती दक्ष असणारे असेही अधिकारी

तहसीलदार-ठाणेदार यांनी आर्णीकरांना दिला कर्तव्याचा परिचय

यवतमाळ । आर्णी अनेक कार्यालयातील अधिकारी आपला कर्तव्य चोख पध्दतीने पार पाडतात असे नाही,तर काही अधिकारी त्यांच्या कर्तव्यात कधीही कसूर न ठेवता नागरिकांच्या हितासाठी नेहमी जागृत राहून कर्तव्य पार पाडत असतात असाच काही अनुभव आज दि.१६ जानेवारीला आर्णी येथील प्रेमनगर परिसरात तहसीलदार पी.भोसले आणि ठाणेदार पितांबर जाधव यांनी अनोखा परिचय दिला.


आर्णी तालुक्यात दि.१५ जानेवारी ला ६६ ग्रामपंचायत साठी निवडणूका झाल्या.निवडणूकीत पोलीस बंदोबस्त आणि महसुल विभागाने मतदान बूथ करिता केलेलं नियोजनामुळे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना डोळ्यात तेल टाकून लक्ष द्यावा लागला त्यामुळे ६६ ग्रामपंचायत मध्ये कुठेही अप्रिय घटना घडली नाही.असे असताना काही तासा पुर्वी कर्तव्य बाजवून पुन्हा लगेच दुसऱ्या कामात 'दक्ष' राहून तहसीलदार आणि ठाणेदार यांनी प्रेमनगर मधील अतिक्रमण काढल्या नंतर त्या ठिकाणी तार कंपाउंड करण्याच्या दृष्टीने सकाळीच हजेरी लावल्याने कर्तव्याप्रती दक्ष असणारे असेही अधिकारी म्हणुन दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला परिचय दिला.


ठाणेदार पितांबर जाधव यांनी सर्वात आधी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीस येणारा अडथळा दुर केला.तद्नंतर देहविक्री आणि अवैध धंद्याचा बाजार भरविण्याचा ठिकाण म्हणजे 'प्रेमनगर' एका झटक्यात उद्ध्वस्त करून सर्व अवैध धंद्दे नियंत्रणात आणले.ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय सह देहविक्री चालत होती.तेथील अतिक्रमण काढून आर्णीकरांच्या डोक्यावर लागलेला कलंक पुसून दुर्गंधी पसरलेल्या परिसर स्वच्छ केले.

कर्तव्याप्रती दक्ष असणारे असेही अधिकारी

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षक भेट देतील का?

गेल्या कित्येक वर्षा पासून गुन्हेगारांना जन्म घालण्याचा ठिक म्हणुन प्रेमनगर ची पोलीस प्रशासन दरबारी नोंद होती.मात्र ठाणेदार,तहसीलदार आणि पालिका मुख्याधिकारी यांच्या प्रयत्नाने प्रेमनगर मधील अतिक्रमण काढून एक प्रकारे गुन्हेगारी नियंत्रणात आणल्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक हे घटनास्थळी भेट देऊन पाहमी करतील का अशी अपेक्षा आर्णीकर व्यक्त करित आहे.

निवडणूका म्हटल्या नंतर पोलीस प्रशासन आणि महसुल विभाग यांच्या साठी तारेवरची कसरत असते.मात्र असे असताना देखील ठाणेदार पितांबर जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून रेड झोन मधील ग्रामपंचायत वर जातीने लक्ष दिल्याने कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यात यश आला. परंतू दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी सकाळीच प्रेमनगर मध्ये हजर होऊन तहसीलदार पी.भोसले यांच्या कडून महसुल विभागाच्या जागेची पुर्ण माहिती घेऊन उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी ठाणेदार यांनी नियोजन केले.सध्या प्रेमनगर परिसरातील अतिक्रमण काढल्या नंतर परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेत आहे. काही तासा आधी मतदान झाल्या नंतर आराम न करता तहसीलदार आणि ठाणेदार यांनी थेट अतिक्रमण काढलेल्या जागेवर हजर होऊन एक प्रकारे कर्तव्याप्रती दक्ष असणारे असेही अधिकारी असल्याची ओळख शहर वाशीयांना दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad