यवतमाळ, दि. १७ ऑगस्ट जिल्ह्यात आज सोमवार ला नव्याने ७० कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले ३६ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३६६५२ नमुने पाठविले असून यापैकी ३६१३१ प्राप्त तर ५२१ अप्राप्त आहेत. तसेच ३३८९३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
आज नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ७० जणांमध्ये ४७ पुरुष आणि २३ महिला आहेत. यात घाटंजी तालुक्यतील कुर्ली येथील दोन पुरुष, महागाव शहरातील एक महिला, महागाव तालुक्यातील गुंज येथील पाच पुरूष, यवतमाळ शहरातील सेवानगर येथील एक पुरूष, श्रीकृष्ण कॉलनी येथील एक पुरूष, शिवनेरी सोसायटी येथील एक पुरूष, गुरवाणी लेआऊट वाघापूर येथील एक पुरूष, तेलीपुरा येथील दोन पुरूष व तीन महिला, आठवडी बाजार येथील एक पुरूष, साईश्रद्धा हॉस्पीटल येथील एक पुरूष, गोदाम फैल येथील एक महिला, पाटीपुरा येथील एक पुरूष व तीन महिला, दाते कॉलेज शिवाजी नगर येथील एक पुरूष, चापनवाडी येथील एक पुरूष, माळीपुरा येथील एक पुरूष व तीन महिला, कावेरी नगर येथील एक महिला, शहराच्या इतर भागातील सहा पुरूष, आर्णी शहरातील चार पुरूष व एक महिला, पुसद शहरातील शेलू प्लॉट येथील दोन पुरूष व तीन महिला, मोती नगर येथील दोन पुरूष, बंजारा कॉलनी येथील एक पुरूष, वानोली येथील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष, झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन येथील दोन पुरूष, कळंब शहरातील सात पुरूष व तीन महिला, उमरखेड शहरातील दोन पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील जैन मंदिर रोड येथील दोन महिलांचा समावेष आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७११ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २२३८ झाली आहे. यापैकी १४६६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ५८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १३३ जण भरती आहे.
