महाराष्ट्र24। लडाख-गलवान खोऱ्यात भारताचे जवान शहीद झाल्या नंतरही चिनी लाल माकडांची सिमेवर घुसखोरी सुरूच असल्याने राजकारण बाजूला ठेवून आदी चीनी लाल माकडांसोबत दोन हात करण्याची गरज असून काॅग्रेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हावी लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला.! असा सल्ला दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे.
चीनने माघार घेतली व दोन देशातील सैन्य कमांडरांमध्ये चर्चा होऊन तणाव निवळाला हे जे रोज सांगितले जात होते त्यातला फोलपणा समोर आला आहे. लडाख व चीनच्या सीमेवर तणाव कायम असल्याचे दिसून येत असल्याने भारताची डोकेदुःखी वाढेल अशा हालचाली कपटी चीन करित आहे. चीनच्या बोलतो एक करतो दुसरेच हे चीनचे राष्ट्रीय धोरण असावे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे
हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा.गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरूणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजुला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काॅग्रेस पक्षाची भाजपला नंतर केव्हावी लढता येईल.आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला.दोन-चार दिवसा आधी माध्यमातून बातम्या आल्या की, चीनने आपले सैनिक मागे घेतले आहे. मात्र चीनी लष्काराने लडाखच्या डेपसांग सेक्टरमध्ये नवे तंबू ठोकले. तोफा, रणगाडे आणले. लष्कार वाढवले. चीनची हेलिकॉप्टर तिथे उतरू लागली.याचा अर्थ काय? काही झाले तरी चिनी सैन्य लडाख सोडायला तयार नाही. म्हणजे चीनने आता नवी चढाई केली आहे व ते आमच्या हद्दीतून मागे हटायला तयार नाहीत.
सध्या देशाच्या राजकारणात शाब्दिक हल्ले सुरू आहेत. त्यामुळे सीमेवर हालचाली करणारी लाल माकडे घाबरून पळून जातील असे त्यांना वाटते. विशेष म्हणजे, सरकारी कृपावंत मीडीया व सोशल माध्यमांवरील रिकाम्या फौजा "भारतीय कुटनीतीपुढे चीनची माघार किंवा शरणागती" अशा बातम्याचे घुसखोरीबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्या वरच चीनचे हस्तक किंवा दलाल असल्याचे ठपके ठेवले जात आहेत अशा समाचार 'सामना'च्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.
भाजपने यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीन कडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरूणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजुला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काॅग्रेस पक्षाची भाजपला नंतर केव्हावी लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला अशा थेट सवाल भाजपला 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
